तुझ्यासाठी तुझ्यासारखं....
तुझ्यासाठी तुझ्यासारखं....
1 min
28.1K
मायलेकींच्या नात्यात एक वेगळाच गंध आहे
दूर रहा किंवा जवळ तरीही एकसंध आहे
शिकवणीतून गुरु वाटत असलीस तरी सांभाळ करण्यात देव आहे
गप्पा करताना मैत्रीण वाटलीस तरी हितगुज करणारी सखी आहेस
रागवताना जेवढी कठोर त्याहून लाड करताना मृदू आहे
सुखात मागे राहिलीस तरी दुःख झेलायला सर्वांच्या पुढे आहेस
आता फक्त एकच इच्छा आहे
पुढच्या जन्मी आई म्हणून नाही तर मुलगी म्हणून भेटावं
उपकाराची परत फेड म्हणून नाही तर
एकदा तरी तुझ्यासाठी तुझ्यासारखं जगता यावं
