तुझ्या स्पर्शात.......
तुझ्या स्पर्शात.......
1 min
83
कडाक्याच्या थंडीत गोठलेल्या हात,
वाफाळलेल्या चहाच्या गरम
कपाभोवती गूंडाळल्यावर जी ऊब मिळते ना.....
ती ऊब तुझ्या स्पर्शात आहे....
स्पर्शावीना एकटंस असणारं लाजाळूचं झाड,
जेव्हा कुणाच्या स्पर्शाने हर्षीत,लज्जीत होतं......
ते सुख तुझ्या स्पर्शात आहे....
मायेवीना आसूसलेल्या लेकराची नजर
त्याच्या आईला भिरभिर शोधते न......
ती भूक तुझ्या स्पर्शात आहे....
