तुझी साथ
तुझी साथ
माझे मन तुझे मन क्षितिजाला एक झाले
...एक झाले
तुझ्या शब्दांनीच माझ्या हृदयाचा ठोका वाढे
तुझी चाहूल लागता अंगी उमलती शहारे
तुला एकदा पाहण्यास मन होई उतावळे
माझे मन तुझे मन क्षितिजाला एक झाले
...एक झाले
तुला जाणून घेताना घालमेल सतावे रे
कधी स्वर्ग सुख सारे कधी अग्नीचे निखारे
तरी मन अनेकदा झुके तुझ्याचकडे रे
माझे मन तुझे मन क्षितिजाला एक झाले
...एक झाले
माझे अडखळती शब्द, तू ते पूर्ण केले,
मन कावरेबावरे, तू शोधली उत्तरे
झाले अबोल मी कधी, मन माझे ओळखले
माझे मन तुझे मन क्षितिजाला एक झाले
...एक झाले
जग जगण्याची रीत, सारी तूच रे शिकविले
माझे भित्रे हे मन, तुझ्या आधाराने सावरले
मागे वळून मी पाहता भरारीचे बळ दिले
माझे मन तुझे मन क्षितिजाला एक झाले
...एक झाले
निःशब्द आयुष्याचे सूर तुझ्याशी रे जुळले
तुझ्या माझ्या भावनांचे ढग दाटुनिया आले
डोळ्यातल्या अश्रूंसवे सुख ओंजळीत आले
मन माझे मन तुझे क्षितिजाला एक झाले........
...एक झाले
