STORYMIRROR

Kranti Gadekar

Others

4  

Kranti Gadekar

Others

नाती जपण्याचा खेळ

नाती जपण्याचा खेळ

1 min
165

मन झगडते, मूक ओठांशी 

लढत राहते व्यक्त होण्यासाठी 

खोल रुतणारा सल मनाला 

पण नाती जपण्याचे भान ओठांना 


प्रश्नांविन उत्तरे, उत्तरांना प्रश्न 

मन कावरेबावरे 

बोलके कराया या ओठांना 

पण नाती जपण्याचे भान ओठांना 


ओठ सांगती मनाला,

नाती मोलाची रे जुळली 

निरस आयुष्याला लय लाभली 

तुज सावरायचे आहे रे मजला 


प्रेमासाठी पारख्या तुला 

सुख स्वर्गीचे लाभले 

मूक ओठांची समजूत मनाला 

तुज सावरायचे आहे रे मजला 


डोळ्यांनी सारे व्यक्त केले 

नात्यांची वीण दाट झाली 

मुक्या ओठांनी बांधले दोन हृदयांना   

मूक ओठांचे फळ मनाला 


तटस्थ मनाला फुटला पाझर 

म्हणे माझी उलघाल तू विसर 

तुझ्या आयुष्यात येऊ दे बहर 

हे मनही तुझ्या साथीला 


पण कधी व्हावे रे मोकळे 

भावनांचा ठेवा करावा थोडा रिता 

नव्या भावनांना साठवायला 

नवी नातीही फुलवायला


Rate this content
Log in