टिपूसं
टिपूसं
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
32
थेंबं टपोरे टिपूसं
मोती सांडते भुवर
आर्त व्याकुळ होऊन
माय झेले अंगावर
येतो सुगंध मातीचा
जणू अत्तर सुवास
पहा डोहाळले तण
होऊ बुभुक्षुचा घास
कसा हसेल डुलेल?
एका जागीचा विठ्ठल
डावी भृकुटी उडती
जणू विणा धरी ताल
&nb
Advertisement
sp; आस करी ओलं मन
उभ्या पिकातलं सोनं
उगवत्या खगा पुढं
ठेऊ जिंदगी गहाण
राजा खुनावे राणीला
जाऊ जोडीने रानात
पिकं येईल भरास
कष्ट बांधून पायात
गातो कष्टाची भाकरी
असा आनंदी सोहळा
जीव ओतला मातीत
डोळे लावून न्याहाळा