ठरवलं होतं खूप काही
ठरवलं होतं खूप काही
1 min
234
ठरवलं होतं खूप काही
बालपणीची मौज लुटायची
खूप खूप सवंगड्यांसारखे
छोटे छोटे सोबती घेऊन
रायरेश्वराच्या मंदिरात नाही
पण मैदानावर शपथ घ्यायची ।।1।।
देश आमुचा शिवरायाचा
आम्ही सैनिक या देशाचे
राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम
शिवरायांच्या कार्याची
ज्योत तेवत ठेवायची ।।2।।
अशी घडावी लोकशाही
फुले-आंबेडकरांच्या विचारांची
जात धर्म अन् पंथ नको
माणूस ही एकच जात
प्रचिती यावी ठायी ठायी ।।3।।
जीवनाच्या या लढाईत
लोकशाहीच्या नावाखाली
स्वातंत्र्याचा विचार आला
स्वार्थाने तर कहर केला
त्यातच बुडाली लोकशाही ।।4।।
भ्रष्टाचाराने कळस चढवला
समाज सेवेच्या नावाखाली
उदयास आली धटिंगशाही
समुद्रालाच आग लागली
कोणी कशी विझवायची ।।5।।
