आई (माय)
आई (माय)
आई ही आईच असते
अन् आपल्याच लेकराची माय असते
पण अनाथ लेकरांची माय व्हते
अशी एखादीच सिंधूताई असते ।।
आपल्या लेकराले आम्हाळते कोम्हाळते
अन् दुसऱ्याच्या लेकराले हिडीस फिडीस करते
आपल्या लेकराले महया राजा म्हनते
अन् दुसऱ्याच्या लेकराले पोट्ट म्हनते
पन दुसऱ्याच्या लेकराले पोटांषी धरते।।
शेजाऱ्याचं लेकरू आजारी पडते
आपल्याच दारात उभी राहून गंमत पाहते
दूरूनच काही माही सल्ला देते
पन त्या लेकराच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत।।
लेकरात लेकरं आंगनात खेळतात
कधी-कधी आपसात मारी मारी करतात
काहून मारलं महया लेकाले
म्हनून दुसऱ्याच्या लेकराले थोबाडीत मारते
पन दोहांले जवळ घेऊन गोडनं समजावते।।
माय म्हनून मोठा टेंभा मिरवते
साळसूद पनाच्या गोश्टीही करते
सगळ्यांच लेकरांले आपलं कुठे समजते
सगळ्याच लेकरावर सारखी माया करते।।
