आठवण
आठवण
1 min
257
होते आठवण बाई मज संसाराची
आंब्यावडाची ही छाया माझ्या सासू-सासऱ्याची
भरलं हे घर माझं लक्ष्मी कृपेने
नंदा जावा बाई माझ्या सुखाला आधण
मंदिरात बाई माझ्या असे परमेश्वर
पायापाशी ज्याच्या मी ठेविले ग मन
वाटते ग मज करू रात्रंदिन सेवा
आहे माझा देव बाई देवाचाभी देव
घर माझ बाई नाही चुन्या ग विटाच
मातीच्या त्या मंदिरात ठाकला संसार
घरात कधी बाई नाही भांडण तंटा
भाशणात सगळयांच्या मिळतो मान मोठा
काम-काम कायबाई काम मज काय
हसत खेत काय सगळयांची राय
वाट माझ्या सासरची मेणाहूनी मऊ
तिथल्या देवांची किती महती मी गाऊ
नारळ फणसाच्या उभ्या ठाकल्या रांगा
लऊनि त्या जणु बाई घालतात पिंगा
सासरचं गांव माझ काय वर्णू बाई गांव
उभ्या परमेश्वरा वैभव कायम त्याचं ठेव
