STORYMIRROR

Mohan Pande

Others

2.6  

Mohan Pande

Others

तशी कशी..तूझ्यासारखी

तशी कशी..तूझ्यासारखी

1 min
393


आज पहाटेची किरणे तूझ्या सारखी

आल्हाददायक..हसरी..आनंदी

ऊष्म..जरा तप्त..तृप्त..

काहीशी गर्विता..

तशी कशी..तूझ्या सारखी...


किरणं किती ही स्त्री सुलभ..

लाजरी, अल्हड, हट्टी निग्रही

पण कर्तृत्ववान..पूरूषी

कोवळी पाने जपण्याची निरागसता

तशी कशी ..तूझ्या सारखी..


किरणं कशी रमताहेत तूझ्या सोनेरी अंगावर

मनस्वी..स्वतंत्र, मूक्त पण भानावर

पाऊलांचा मनोवेध घेणारी,

सूंदर, डौलदार, दव साठवून पावलं सूखावणारी

सर्वांना सहज सखी वाटणारी व निरागस

तशी कशी..तूझ्या सारखी..


आवडलेली...भावलेली तू...

तूझ्या सारखी..हिरवळ ल्यालेली...


किरणं शोषलेली..

तूच फक्त तूझ्यासारखी..


Rate this content
Log in