STORYMIRROR

यमुना निलखन(माळी)

Others

0  

यमुना निलखन(माळी)

Others

तळे

तळे

1 min
778


आठवणींचा इतका भार देऊ नका

की डोळ्यातील तळेही आटून जाईल!!

रूप तर सर्वाना मिळून जाते,

पण शृंगार मिळत नाही,

अश्रू तर मिळतात न मागताही

प्रेम असतेही पण ते मिळत नाही, जीन साकार कराल ती

स्वप्नील दुनिया देऊ नका!!१!!

जेवढे होते बनविले तेवढेही चुकले

जीवनाच्या चित्र कुणाचे,

तहानच कधी पाणी बनेल?

आशेवरच आहे दुनिया सारी,

चंद्राची पडछाया बनून

मनाच्या समुद्राला ताप देऊ नका!!२!!

आधुनिकतेची रितच निराळी

स्पर्धा येथे हार जीतची,

शुद्ध मनाची दौलत पडते फिकी

अन मिळते किंमत बहुरूपी मनाची,

सूर देणारीच तार तुटुन जाईल

इतकेही तारेला झनकारु नका!!३!!

आठवणींचा इतका भार देऊ नका,

की डोळ्यातील तळेही आटून जाईल!





Rate this content
Log in

More marathi poem from यमुना निलखन(माळी)