Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vaibhav Bhivarkar

Others

1  

Vaibhav Bhivarkar

Others

ती...तिची मासिक पाळी अनं समाजमान्य बलात्कार

ती...तिची मासिक पाळी अनं समाजमान्य बलात्कार

2 mins
1.5K


 पंधरा सोळा वर्षाअगोदर तिने एक स्त्री म्हणून जन्म घेतला, अन्  तिच्या आजीच्या कपाळावर जबरदस्त आठ्या पडल्या. तिची आई प्रसववेदनेचा त्रास सहन करू शकली नाही. आईनेही मृत्यूला कवटाळले, अन तिला न सांगताच निघून गेली. एकीकडे मायेचं छत्र हरवलं, दुसरीकडे एका स्त्रीनेच तिचे स्त्रीत्व नाकारले, नातवाच्या हव्यासापोटी. खरे म्हणजे तिला आधार हवा होता ह्या दुःखातून सावरायला. पण, तिलाच अवदसा ठरवल्या गेलं. आज ती सोळा वर्षांची झाली, ती निरामय होती, निरपराध होती निरागस होती. अचानक खेळता खेळता पोटात दुखायला लागले, तिच्या लघवीच्या जागेतून भडाभडा रक्त यायला लागले. तो प्रकार पाहून ती बावरली, समजेना तिला काय करू? ती ओक्साबोक्सी रडत होती अन्ं मैत्रीणी हसत होत्या. त्यातल्याच एका पोरीने आता तू 'मँच्यूअर' होत आहे म्हणून सांगितले. तिला कळेना हा प्रकार, आई गेल्यानंतर तिला हे काय सांगणारं कोणीही नव्हतं. घरी गेल्या गेल्या कपड्यावर पडलेले डाग आजीने ओळखले. ती तिच्यावर ओरडली अन फरफटत तिला बाथरूम मधे नेलं, तिची साफसफाई केली. अन चारदीवस बाहेर न पडण्याची सक्त ताकीद देत तिचे कानफड शेकले, चूक नसूनही. ती अजूनही रडतच होती. त्याच रात्री आजीने, तिच्या बापाला पोरगी मोठी झाल्याचे खुणावत ओझं लवकर कमी करायचा सल्ला दिला. बापाने महिनाभरातच तिला न विचारता पुढ्यात आणून उभा केला राकट वळू. आणि ठोकून दिली लग्न नावाची बेडी. दिले ढकलून तिला सासर नावाच्या कैदखान्यात. तिचा काहीही गुन्हा नसतांना. ती बिचारी सगळं कर्तव्य म्हणून सहन करत होती. दहा ठिकाणी चरलेल्या वळूला आज लुसलुशीत चारा मिळाला होता. तो तळमळत होता, चारा खाण्यासाठी. पहिल्याच रात्री तो तिच्यावर तुटून पडला अधाश्यासारखा. आणि ती बेशुद्ध पडेपर्यंत त्याने पिळून काढले तिचे अंगप्रत्यंग. तिला समजतच नव्हते की तिच्या बाबतीत घडतय काय? त्या राकट बैलासाठी ते लग्न होते पण, तिच्यासाठी तो समाजमान्य बलात्कार होता. रोज रात्री तिच्यावर होणारा. अशा अनेक रात्री तिचा विचार न करता, तो बलात्कार होतच राहिला. ती गर्भार असल्याचे समजले सगळे आनंदीत झाले. पण, तिचा त्रास तिलाच कळत होता. नऊ महिने, नऊ दिवस झाले अन् दिला तिने जन्म एका मुलीला. असह्य झालेल्या त्रासाने ती पण गेली सोडून जग तिच्या आईप्रमाणे. मुलीला वाऱ्यावर सोडून. परत एकदा, तिच्या मुलीचे स्त्रीत्वाचे हक्क नाकारण्यासाठी, परत तिला अवदसा ठरवण्यासाठी. परत एकदा मासिक पाळी आल्यानंतर लगेचच बेड्या ठोकून लग्नाची शिक्षा देण्यासाठी. परत एकदा समाजमान्य बलात्कार होण्यासाठी. तिचा गुन्हा तो काय? ती फक्त एक स्त्री होती. असंख्य यातना सोसून तुम्हा आम्हांला जन्म देणारी. 


Rate this content
Log in

More marathi poem from Vaibhav Bhivarkar