"स्वातंत्र्य"
"स्वातंत्र्य"
होती एकच संस्कृती आमची
जरी आम्ही विभक्त होतो. . .
सुखी संपन्न अन् साधेच असलो
तरी आम्ही मुक्त होतो॥
ते गोड बोलून घरात घूसले
अन सत्ता हातात घेउन बसले. . .
अम्हाला आपापसात लढवून
ते गालातल्या गालात हसले॥
त्यांनी आम्हाला गुलाम बनवलं
आमच्याच जमिनीत बैलासारखं राबवलं. . .
सारं वैभव लूटून न्हेलं
अन अम्हाला अक्षरश: नागवलं॥
अमचं कसब आमची कला त्यांनी मोडीत काढली
पूर्वापार ज्ञानाची पूंजी खोल जमिनीत गाडली
आम्हाला पूरतं पंगू बनवून
स्वत:ची प्रगती आमच्या समोर वाढली॥
स्वातंत्र्यासाठी मग आम्ही बंड पूकारले
बांधलेले हात तलवारी घेउन ऊगारले. . .
गूलामासारखे जगण्या पेक्षा
लढून वीरमरण स्विकारले॥
पण कोण होते 'ते'?
होते परकीय की आपलेच होते?
खरचं झालोय का आपण मुक्त
की स्वातंत्र्याचे ते भासच होते?
की आहोत अजूनही गुलाम
खोट्या रुढींचे अन् पोकळ परंपरांचे?
अजूनही आवळलेत पाश सावकारीचे
अन् होतोय बळी अंधश्रद्धेचे?
कधी तूटतील सारे खोटे पाश?
कधी होईल सर्वांचाच उद्धार?
आता कधी मिळेल खरं स्वातंत्र्य?
कधी सरेल अज्ञानाचा अंधार?
