स्वार्थी
स्वार्थी
1 min
310
एक बाजू मनाला पटणारी असते
एक डोक्याला खटकणारी असते
याच संभ्रमात आयुष्य साऱ्यांचं फसते
चुका स्वीकारायला लागते हिंमत
खोट्या आयुष्याची हिच तर गंमत
स्वसुख प्रिय ज्याला, कळेना दुसऱ्याच्या वेदना
स्वार्थाची कधीच मेलेली असते संवेदना
भावनांची तडजोड तर जमेना त्यांना
तोडण्याचा गुन्हा ते करे पुन्हा पुन्हा
नकारात्मकतेचा दृष्टीकोन ते डोळ्यावर बांधतात
आपल्याच माणसांना मग तराजूत तोलतात
