सुटका
सुटका
1 min
200
आता तरी सुटका हवी......
बंधनातून, विचारांतून
मतभेदातील मनभेदातून
अबोल्याच्या किर्र आवाजातून
बुरसटलेल्या रिवाजातून
नको असलेल्या जीवणातून
लादलेल्या जाचक नियमातून
एकांताच्या क्षणातून
बंदी असलेल्या मनातून
आयूष्याच्या तुरूंगातून
लांब अंधार्या सुरूंगातून
असहणीय नकोश्या त्रासातून
असत्य अश्या भासातून
वाईट असलेल्या नादातून
मन हेलावणार्या वादातून
खोट्या खोट्या वागण्यातून
ऐकण्या सांगणातून
भ्रमातल्या भविष्यातून
आणि सत्यातल्या आयूष्यातून
होऊदे सुटका आता तरी.....
