सुचले जे शब्द त्यांनी
सुचले जे शब्द त्यांनी
1 min
147
सुचले जे शब्द त्यांनी
गझल साकारीत गेलो
जाहल्या ठिकऱ्या कितीही
आयुष्य आकारीत गेलो
ना कधी पर्वाह केली
ऐलतीरी वा पैलतीरीची
जीवनाची नौका तरीही
बेफिकर वल्हवित गेलो
रुतले अनंत काटे
जखमा ही अगणितशा
भळभळ अश्वत्थाम्यापरी
कपाळी मी मिरवित गेलो
ठिगळ ठिगळ जोडून
पांघरावे प्रेम हे
का नको त्या भावनांना
सांंग मी ऊसवित गेलो ?
सरल्यावर ही कातरवेळ
संपून गेला सगळा खेळ
उमगून आले मलाच तेव्हा
स्वतःला कसे फसवित गेलो
