STORYMIRROR

Manohar Balkrishna Dalvi

Others

4  

Manohar Balkrishna Dalvi

Others

भूत सोशल मिडियाचे

भूत सोशल मिडियाचे

1 min
465

सोशल मीडियावर राहून सुद्धा

एकटा आहे मनुष्य

का सगळी कडे दिसते आहे

तेच तेच द्रुश्य


फेसबुक इनस्टाग्राम

पाहून होते का दुःख

त्या पेक्षा रहा ना

तुम्ही आणि मोबाईल गप्प


दुसऱ्या ची मजा बघून

करु नका क्लेश

वाचन करा लिखाण करा

दुर करा द्वेष


छंद आपुले जोपासा

दवडू नका वेळ

परंपरा आणि आधुनिकतेचा

साधावा अचूक मेळ


मित्र म्हणून सांगतो

मोलाचा सल्ला एक

जीवन सुंदर आहे

जगा बिनधास्त नेक



साहित्याला गुण द्या
लॉग इन