STORYMIRROR

Manohar Balkrishna Dalvi

Others

4  

Manohar Balkrishna Dalvi

Others

आयुष्य थोडी बेरीज थोडी वजाबाकी

आयुष्य थोडी बेरीज थोडी वजाबाकी

1 min
415

आयुष्य म्हणजे असते का बेरीज आणि वजाबाकी?

की असतात काही अपूर्णांक कधीच न संपणारे


का बे दुणे चार प्रत्येक वेळी होत नाही

हातचा द्यायचा राहून जातो उत्तर बरोबर येत नाही


नाही जमला मला शब्दांंचा भागाकार

आणि मी गुणत राहीलो शुन्याला शुन्याने


कळतात सगळ्याना स्वार्थाची सुत्रे

माझ्या भोवती च मी आखलाय स्वकेंद्रित परीघ


समांतर चालायचे की काटकोनात वळायचे नाही ठरले अजून

कारण मी शोधतोय केंद्र बिंदू मनाचा, मनातल्या मनात क्ष मानून.


Rate this content
Log in