स्त्री शक्ती
स्त्री शक्ती
1 min
380
स्वातंत्र्य देवते पट्टी बांधूनी डोळ्यावरती
न्याय असो वा अन्याय कधीच नसतेच
आमच्या का बाजूनी.?
सोसलेस तू अविरत अजूनही सोसतेस
जन्म दिला मातेने तिलाच लाथाडलेस
किती अजूनी कळ्या अवेळी खुरडणार
किती जन्मानंतर नरकयातना सोसणार
जुलूमाच्या जोखडातून कधी मूक्त होणार
कधी ताठमानेनं सर्वत्र स्वच्छंद बागडणार
दे झूगारून आता सारे हो रणरागिणी पुन्हा
अन्याया विरूध्द ऊठ पेटूनी शपथ घे पुन्हा
स्त्री न बला आहे सबला दाखव पुन्हा
पुन्हा स्वावलंबी भर धारिष्ट अंतरात पुन्हा पुन्हा
तोडल्या शृंखला मी माझ्याच मनाच्या
करणार प्रतिकार आता युक्तीने संकटाच्या
जन्म माझा न जावू देणार असा वाया
झुंजणार मी जोवर कुडीत प्राण श्वास लढाया
