प्रेम
प्रेम
1 min
226
जगण्यावर करिती प्रेम सर्वजण
तरीही का तंटाबखेडा करिती
प्रेम नसे हे जगण्यावर उगा का
फसवत असता स्वतःच होऊन
प्रेम करावे निरपेक्ष म्हणती जन
नाशवंत देहावरी अपार स्वप्रेम
फुका जन्म लाभला म्हणूनी का
काळजी न घेतो माणूस जाणून
घार उडे परी चित्त पिलावरी
कासवाची पिले दूर राहूनी
शिकविती कला जगण्याची
मनुष्य, जन्मा घे ज्ञान सत्वरी
