सप्तपर्णी......
सप्तपर्णी......
1 min
411
सप्तपर्णींचा मंडप दारी
सात पानांची साथ भारी
रंग तर एकच ल्याली
त्याच रंगाची रंगत भारी......
हिरवळतेच्या गडद रंगाने माखलंय
अंग तिचं गर्द दाटी पानांची,
अन् मनी सावलीचं ओझं बहरते ती क्वचितच...... बहर मात्र कायम असते सप्तपर्णे तू मला माझ्यासारखीच भासते.....
