STORYMIRROR

Pankaj Tikone

Others

3  

Pankaj Tikone

Others

सलाम सलाम सलाम… सचिनला सलाम

सलाम सलाम सलाम… सचिनला सलाम

3 mins
29.3K


(जेष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकारांची माफी मागून )


सलाम सलाम सलाम

क्रिकेट खेळाला सलाम,

क्रिकेट खेळ शोधनारयाला सलाम,

क्रिकेट पाहनारयाना सलाम,

क्रिकेटला शिव्या घालणार्यांना सलाम,

क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटवेड्या देशांना सलाम,

अशाच क्रिकेटवेड्या देशांतील एक भारत देशाला सलाम,

भारतदेशातील क्रिकेटवेड्या प्रेक्षकांना सलाम,

सलाम सलाम सलाम…


सचिनला पृथ्वीवर पाठविणाऱ्या देवाला सलाम,

सचिनला जन्म देणाऱ्या, वाढविणाऱ्या आई वडिलांना सलाम,

सचिनला क्रिकेटचा श्रीगणेशा करायला लावणाऱ्या भावाला 'अजित' ला सलाम,

सचिनच्या काका काकूंना सलाम,

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणाऱ्या त्याच्या पत्नीला 'अंजलीला' सलाम,

सचिनच्या सगळ्या परिवाराला सलाम,

सलाम सलाम सलाम…


सचिनचे क्रिकेट गुरु रमाकांत आचरेकरांना सलाम,

सचिनने क्रिकेटचे धडे ज्या मैदानावर गिरवले त्या मैदानाला सलाम,

सचिनला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व मार्गदर्शकांना सलाम,

सचिन बरोबर क्रिकेट खेळलेल्या सर्व मित्रांना सलाम,

सचिनच्या शाळेला सलाम,

शाळेतील सर्व गुरुजनांना, कर्मचार्यांना सलाम,

शारदाश्रम शाळेकडून खेळताना सचिन - विनोद ने रचलेल्या विक्रमी भागीदारीला सलाम,

सलाम सलाम सलाम…


सचिनचा मुंबई रणजी संघात समावेश करणाऱ्या दिलीप वेंगसकराला सलाम,

भारतीय संघात तुझा समावेश करणाऱ्या निवड समितीला सलाम,

पहिल्या सामन्याला तुला स्वता :चे पॅड देणाऱ्या सुनील गावसकारला सलाम,

ज्याच्यापासून तुला क्रिकेट खेलण्याची प्रेरणा मिळाली त्या कपिल देव ला सलाम,

तुला प्रोत्साहित करणाऱ्या, धीर देणाऱ्या, मार्गदर्शन करणाऱ्या सगळ्यांना सलाम,

तुला ज्यांच्यासोबत खेळण्याचे भाग्य मिळाले, अशा महान खेळाडूंना सलाम,

तुझ्या सोबत खेळण्याचे भाग्य अशा तुझ्या सहकार्यांना सलाम,

सलाम सलाम सलाम…


तू खेळलेल्या प्रत्येक सामन्याला सलाम,

ज्या ज्या मैदानावर तू खेळला, त्या मैदानांना सलाम,

सामन्यातील तू खेळलेल्या, न खेळलेल्या प्रत्येक बॉलला सलाम,

तुझ्या बॅट मधून निघणाऱ्या प्रत्येक रनला, चौकाराला, षटकाराला सलाम,

तू शोधलेल्या v drive, paddle sweep, upper cut, let cut, cover drive ला सलाम,

तुझ्या विक्रमी अर्धशतकांना, शतकांना, सलाम,

तुझ्या नर्व्हस नाईटीसला सलाम,

तू शून्यावर बाद होणाऱ्या शून्याला सलाम,

तुझ्या प्रत्येक विक्रमाला सलाम,

तुझ्या सर्व दुखापतीना ( टेनिस एल्बो ) ला सलाम,

दुखापतीतून, निराशाच्या वातावरणातून बाहेर पडून प्रत्येक वेळी यशस्वी पुनरागमन करणाऱ्या

तुझ्या फ़िनिक्स भरारीला सलाम,

मोठी खेळी केल्यानंतर अत्यंत संयमाने ती अभिव्यक्त करणाऱ्याअभिव्यक्तीला सलाम,

सलाम सलाम सलाम…


शेन वॉर्नच्या स्वप्नात जाऊन स्वप्नात त्याची धुलाई करणाऱ्या सचिनला सलाम,

प्रत्येक गोलंदाजाच्या मनात धडकी भरवणाऱ्या सचिनला सलाम,

तुला खुन्नस देणाऱ्या सर्व गोलंदाजाना सलाम,

अशा खुनशीपणाला खुन्नसने नव्हे, तर आपल्या बॅटने उत्तर देण्याच्या तुझ्या स्वभावाला सलाम,

या पलीकडे जाऊन मैदानाबाहेर तुझ्या मैत्री करणाऱ्या आणि ती जपणाऱ्या तुझ्या निस्वार्थी वृत्तीला सलाम,

सलाम सलाम सलाम…


शाळेत असताना 'सचिन-विनोद' या जोडीने केलेल्या विक्रमी भागीदारीला सलाम,

कसोटीतल्या, वनडेतल्या तुझ्या पहिल्या शतकाला सलाम,

शारजातल्या तुझ्या विस्फोटक खेळीला सलाम,

वडील वारले असतानाही संघहितासाठी परत येउन केलेल्या शतकी खेळीला सलाम,

वर्ल्ड कप मधील अविस्मरणीय कामगिरीला सलाम,

'सचिन-राहुल' ने रचलेल्या विक्रमी भागीदारीला सलाम,

खेळत असताना तुझ्या सहकारी खेळाडूना, संघातील नवोदितांना उत्तम खेळासाठी प्रोत्साहित करणाऱ्या निस्वार्थी वृत्तीला सलाम,

सलाम सलाम सलाम…


सचिनच्या नावावरून आपल्या मुलांची नावे 'सचिन' ठेवणाऱ्या सर्व आयांना सलाम,

आपल्या मुलांनीही तुझ्या सारखा उत्तम क्रिकेटर व्हाव्हे म्हणून नाक पुसन्याचीही अक्कल नसताना, त्यांना क्रिकेट अकादमीत पाठवणाऱ्या सर्व बापांना सलाम,

तू आउट झाल्यवर टीव्ही बंद करणाऱ्यांना सलाम,

तेंडल्याने आज शतकच ठोकले पाहिजे, असे पर्त्येक सामन्याच्या वेळी म्हणणाऱ्याना सलाम,

तू खेळत असताना सगळी कामे सोडून टीव्ही समोर बसणाऱ्या तुझ्या चाहत्यांना सलाम,

या चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून न जाता, प्रत्येक वेळी आपल्या कामगिरीतून प्रेक्षकांना आनंद देणाऱ्या सचिनला सलाम,

सलाम सलाम सलाम…


सचिनचे देशासाठी काय केले? सचिनचे सामाजिक कार्य काय? असे म्हणणाऱ्यान सलाम,

सचिन फक्त वैयक्तिक हितासाठी, रेकॉर्डसाठी खेळतो,असे म्हणणार्यांना सलाम,

सचिन श्रेष्ठ कि दुसरे कोणी असे निरर्थक वाद पेटविनारयाना सलाम,

अशा टीकांना न घाबरता, शब्दाने नव्हे, तर आपल्या कामगिरीतून, सामाजिक कृतीतून प्रत्युत्तर देणाऱ्या सचिनला सलाम,

सलाम सलाम सलाम…


गेली २४ वर्षे करोडो भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे झेलत, त्याखाली दडपून न जाता, न थकता तमाम देशवासियांना आपल्या खेळातून आनंदी करणाऱ्या सचिनला सलाम,

धर्म, जात, भाषा, पंथ, ई मध्ये विभागलेल्या देशाला आपल्या खेळाद्वारे एकत्र बांधणाऱ्या सचिनला सलाम,

या मोहमायी जगात कुठल्याही अमिषाला बळी न पडता, मैदानात आणि मैदानाबाहेरही निष्कलंक जीवन जगणाऱ्या, आपली तत्वे सांभाळनाऱ्या आणि आपल्या वागणुकीतून इतरांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या सचिनला सलाम,

हे सर्व साध्य करण्यासाठी तू घेतल्याल्या कठोर परिश्रमांना, कष्टांना, तुझ्या जिद्दीला, तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी केलेल्या त्यागाला सलाम,

तुझ्या क्रिकेटवरील प्रेमाला, निष्ठेला सलाम,

शब्दही अपुरे पडतात अशा शांत, संयमी, विनम्र, सदाचारी ऋषितुल्य, महान, सुसंस्कृत व्यक्तिमत्वाला सलाम,

सलाम सलाम सलाम…


शेवटी,

क्रिकेटच्या देवाला सलाम,

एका महान क्रिकेटरपेक्षाही माणसातील माणुसकी जपणाऱ्या, टिकवणाऱ्या माणसातील देवत्वास सलाम,

सलाम, सलाम, सलाम…


Rate this content
Log in