सलाम सैनिक हो
सलाम सैनिक हो
मानवंदना हे शांत झोपलेल्या माणसाला जरा जागा होऊन पहा तुला गाढ झोप देण्यास कोणी जाळतोय देहा माय भूमि च्या रक्षणासाठी उभा गडी सीमेवर तिरंगा फडकवा नभात हे त्याचे सणवार माय पित्याची छाया त्याच्यापासून दुरावली लेकरे मोठी होताना त्याने कधी ना पाहिली होळी दसरा-दिवाळी सारे खाती पुरणपोळी त्याच्या छातीवर मिळे एक बंदुकीची गोळी भारत मातेसाठी देती आपल्या प्राणांची आहुती तरीही अशा सैनिकांना तू ओळखतोस किती तेच तर आपले खरे रक्षण करते त्यांच्यात पाहून श्री गजानना या स्वातंत्र्य दिनानिमित्त देऊ त्यांनाही मानवंदना
