"सिद्धार्थाचे गाणे ...."
"सिद्धार्थाचे गाणे ...."
1 min
41K
कुणी निळा लावतो टिळा कुणी भगवा लावून जातो
मी मंगल मैत्री साठी सिद्धार्थाचे गाणे गातो...
त्या महालात गुदमरतो गरिबाची झोपडी दिसता
मी उजेडात या फसव्या अंधाराचे गाणे गातो...
रंगात विखुरली गेली सारी मायावी ही दुनिया
मी निळ्या नभाला सारून वाऱ्याचे गाणे गातो...
ते निघून गेले सारे चितेला अग्नी देता
मी राखे समोर बसुनी करुणेचे गाणे गातो...
हे बरे झाले त्यांनी खंजीर खुपसला पाठी
वाघाचे काळीज घेऊन मी हरणाचे गाणे गातो
इथे रोजच पडती मुडदे रंगाच्या झेंड्यासाठी
मी झोळी फाटकी घेऊन जगण्याचे गाणे गातो..
