शत्रू खरा पाहिजे
शत्रू खरा पाहिजे
1 min
40.9K
तूझ्यासारखा लखलखता
हिरा पाहिजे.
शत्रू असावा खरा,
खरा पाहिजे.
दोस्तीत काय, असे ठेवले
चलो छोडो यारों.
दुश्मनीचा जबर
दरारा पाहिजे.
पाठीत घालणे सुरा
ही तर्हा असे दोस्तांची.
ही न पटे जमात, या जन्मात
दुश्मन बरा पाहिजे.
केसाने कापणे गळा
न तुला ही अवगत कला.
करतोस वार थेट आलाच
शहारा पाहिजे.
हे उजळीता भाग्य आमुचे
शत्रू लाभला असा,
मारू किंवा मरूचा खासा
नारा पाहिजे.
किती सचोटी तुझी भावते
दुश्मनीतली दोस्ता.
होण्यास तप्त, हे रक्त,
तुझा हाकारा पाहिजे.
खुनशी जरी तू कुशल बेरकी,
विसरणार नाहीस मला
ताळ्यावर तुझ्या येण्या
माझा फटकारा पाहिजे.
