श्रावण हर्ष
श्रावण हर्ष
श्रावणमासी, पाऊस देशी
ऊन-सावली चोहीकडे,
क्षणात येती ऊन कोवळे
मला सोडुनी दूर पळे...!!ध्रु!!
नभांगणी या मेघ दाटले
हिरवा शालू नेसुनी नटले,
दऱ्या टेकड्या हिरवेगार,
या झाडावरुनी त्या झाडावर
रानपक्षीचा सूर घुमे
क्षणात येती ऊन सावली..........!!१!!
फुळाफुला, मकरंद चाखती,
फुलपाखरू हे बागडते,
सूर्याचे हे किरण कोवळे,
वळणा-वळणांतुनी तरंगते
क्षणात येती ऊन सावली..........!!२!!
वाहते पाणी शीळ घालते
मंजुळ स्वर हे का घुमते,
आकाशातुनी पक्षी थव्यांचे,
नदी माहेरचे, गुण गाते
क्षणात येती ऊन सावली..........!!३!!
श्रावणमास भुरळ घालतो
लंघन करोनी दिवस घालतो.
उपवासाचा नवस घेउनी,
आकांक्षाचे पंख लेऊनी.
क्षणात येती ऊन सावली...........!!४!!
