STORYMIRROR

Bharat Kakulate

Others

4  

Bharat Kakulate

Others

"गुरू महती"(अष्टाक्षरी काव्य)

"गुरू महती"(अष्टाक्षरी काव्य)

1 min
225

तुला करतो वंदन

काळजात रुतली तू,

तिला कष्टाची भाकरी,

जागा हृदयात केली तू. ||१||


लढणार या जीवना

तुझा कृपा प्रसाद हा,

रस्त्यावर चालतांना,

तोल जाईल कसा हा. ||२||


माय माऊलीची छाया

शिक्षणाची तिला जाण,

मजुरीची आस तिला ,

असे जीवनाचे भान. ||३||


अशिक्षित माय माझी

नाही शिकली शाळा तू,

शिक्षणाचे वेड कसे,

मनात घर केलं तु. ||४||


भाऊ बंधकीचे प्रेम

आपसूक तुझ्या दारी,

तुझ्या शब्दात माझा मी,

झालो तुझा वारकरी. ||५||


नाही कपट तुझ्या या

बोलण्या गुपीत नसे,

वासराची जणू गाय,

भरवसा का  नसे. ||६||


Rate this content
Log in