"आजचा पेपर जुना झाला"
"आजचा पेपर जुना झाला"
1 min
512
काल रात्री बातमी छापली
दिवस उगवताच जुनी झाली.
कोण कोणाचे राहिले आहे
छाती ठोक सांगत नाही.
हल्लीचे राजकारण बरे नाही
हा तर पोरांचा रड्या खेळ आहे.
लोकहो व्हा आता हुशार
चालली खुर्चीसाठी मारामार.
दैवावर ठेवा विश्वास
प्रगती बुद्धीच्या कसावर.
