शिवराज्य
शिवराज्य
शिवराज्याला तनामनाने जपा
जणु जीवाला जीवाला अपुल्या जपा॥धृ॥
शिव घुसु द्या मनामनात अपुल्या
शिव दिसु द्या कर्तुत्वात अपुल्या
शिव बसु द्या ह्रदयामध्ये अपुल्या
शिव हसू द्या गालागालात अपुल्या॥१॥
शिवशक्ती ही पसरु आसमंतात
शिवभक्ती ही वाढो भारतात
शिवधर्म हा वाढू द्या जगतात
शिवदीप ते लावा घराघरात॥२॥
जीवाशिवाचे ऐक्य बरे साधुन
शिवनीतीने ठेवावं वागणं
शिवासमान असावं बघणं
शिवासमान संकटास झुंजणं॥३॥
शिवझेप ती घ्यावी समुद्रापार
शिवासमान व्हावे खरे शूर
शिवासमान व्हावे हो चतूर
शिवकर्म ते करावे निरंतर थोर*॥४॥
समतेचे ते घडवुया शिवराज्य
बंधुत्वाचे बनवुया शिवराज्य
स्वातंत्र्याने नटवुया शिवराज्य
न्यायशीलाने स्थापुया शिवराज्य॥५॥
जाती मोडूनी स्थापुया शिवशाही
मानवता जपुनी जपुया शिवशाही
न्यायासाठी लढुनी जपुया शिवशाही
समता रक्षिण्या वाढवुया शिवशाही॥६॥
