STORYMIRROR

Mahesh Lokhande

Others

4  

Mahesh Lokhande

Others

जय जय शिवराय

जय जय शिवराय

1 min
238

दरीदरीतून नाद घुमतो 

हर हर महादेव

सह्याद्रीचे कडे गर्जती 

जय जय शिवराय॥धृ॥


स्वातंत्र्यास्तव लाख अर्पिल्या

 लाख इथे माना

स्वराज्यास्तव मरण जिंकिती

हाच मराठी बाणा॥1॥


शिवपुत्रांनो शिवराज्यास्तव

 एक होऊ या सगळे

जातीभेद विसरूनी होऊ

 एक शिवमावळे॥2॥


मरहट्टा बनुनी सारे 

जिंकु उच्चपदगड

चल मावळ्या सन्मानाने 

 अधिकारीपदी चढ॥3॥


शिवछावा होऊनी नव

झेप घेऊ या सारी

शिवचरित्र पारायणे

 करूया घरोघरी॥4॥


शिवविचारांचा दिवा 

पेटवू या मनी

शिवनीतीने जीवन घडवु

आपण क्षणोक्षणी॥5॥


शिवसूर्याची विचारज्वाला

पसरवू जगात

शिवप्रेरणामूर्ती बसवू

आपल्या हृदयात॥6॥


Rate this content
Log in