Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Archana Aher

Others

3  

Archana Aher

Others

शिक्षक दिन

शिक्षक दिन

1 min
670


शिक्षक म्हणजे एक शिल्पकार ….

        जो विद्यार्थी व्यक्तिमत्वाचे उदात्त शिल्प घडवतो शिक्षक म्हणजे एक

शिक्षक म्हणजे एक लेखक….

    जो विद्यार्थी मनाच्या कोर्‍या पाटीवर सदर विचारांचे धडे गिरवतो

शिक्षक म्हणजे एक वाचक …..

        जो विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव अचुक वाचत असतो

शिक्षक म्हणजे एक वक्ता….

    जो विद्यार्थ्यांवर सुसंस्कार करण्यासाठी अनेकविध विषयांवर बोलत असतो

शिक्षक म्हणजे एक उत्तम नेता….

    विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांचे आणि समाजाचे नेतृत्व करीत असतो

शिक्षक म्हणजे एक मार्गदर्शक….

    जो योग्य-अयोग्य ची ओळख करून घेण्यास शिकवतो

शिक्षक म्हणजे एक युगप्रवर्तक….

   जो देशाचे भावी नागरिकांची आदर्शवत पिढी घडवतो

शिक्षक म्हणजे सर्वगुणसंपन्न परिपूर्ण गुरु

   जो प्रत्येक व्यक्तीला आदर्शवत असतो

सर्व गुण हे भारी एका शिक्षकाच्या ठायी ….

   म्हणूनच विनम्र माझा माथा त्यांच्या पायी


Rate this content
Log in

More marathi poem from Archana Aher