STORYMIRROR

Pravin Kavanakr

Others

4  

Pravin Kavanakr

Others

शीर्षक. दसरा

शीर्षक. दसरा

1 min
456

पहाट झाली सण दसरा सर्वांचा करुया साजरा 

आजचा तुमचा दिवस आनंदाने नेहमी हसरा


उधळण घातली नऊ दिवसांच्या अंतराने रंगाची

आराधना केली मंडपात बसलेल्या दुर्गा देवीची


रांगोळी सजली अंगणात फुले आणली झेंडूची

सजविले घर माळ बनवली झेंडूच्या फुलांची


तोरण बांधले बहरलेल्या बागेतील रंगीत फुलांचे

हिरवेगार गालिचे पान ओतले त्यात आपट्याचे


आपट्याच्या पानाला सर्वांचा मान आहे लुटायचा

दुःख सारे बाजूला करून हळूच सारे विसरण्याचा


पूजा आर्चा ध्यानीमनी भक्ती भावाने प्रार्थना केली

देवतांची पूजा करून भविष्याची स्वप्ने मनात रंगली


Rate this content
Log in