दिवाळी
दिवाळी
1 min
303
दिवाळी आली सण
अशे फार आनंदाचा
सुख समृध्दी जीवन
चैतन्यमय उत्साहाचा
दिप पणती तेज्याने
आकाश कंदील उजळते
अंगणात रांगोळी काढून
दारात तोरण चमकते
लाडू चकली करंजीचा
सुगंध असतो घरोघरी
मुले फटाके फोडण्यात
घाई असते दारोदारी
मातीतूनी उभारला गड
किल्ला शिवरायांचा
शिवरायांचा विचार करता
मुजरा असावा महाराजांचा
प्रदूषण मुक्त दिवाळी
साजरी व्हावी आनंददायी
जीवनात स्मारक ठरेल
ध्वनीप्रदूषणाने आरोग्यदायी
