"शासन "
"शासन "
1 min
27.3K
मी ज्याला काल एका मुलीची छेड काढतांना पाहिलं,
आज त्यानेच स्रियांवर होणा-या अत्याचाराचं गाणं गायलं...
काल तर हा आणि याचे साथीदार फिदीफिदी हसत होते,
आणि आज तर सा-या समाजाचा आधार जणू भासत होते...
अशा षंढांची धिंड काढावी आणि करावं त्यांना जबर शासन,
कारण अत्याचार करून सावसुदपणाचं, नाटकी यांचं व्यसन..
शिवबांसारखं भर चौकात तोडावे यांचे हात आणि पाय,
मग स्रीकडे वाईट नजरेने पाहण्याची यांची हिम्मत होईल काय?
नपुंसक करून यांना डांबून ठेवावं काळकोठडीत,
आणि तेवढ्यानेही थांबू नये तर ओढावे तप्त आसूड...
समाजभेदी हे अतिरेकीच खरे असतात समाजवैरी ,
अत्याचार करून हेच पुन्हा झाडतात जाळपोळ, दंगलीच्या फैरी...
ओळखावे असे नराधम आणि घालावे वेळीच आवळून वेसन...
वाचतील कोवळ्या कळ्या, आणि वाचेल समाज होण्यापासून रण...
