STORYMIRROR

Uma Kolhe

Others

4  

Uma Kolhe

Others

साथ

साथ

1 min
41K


साथ -

  जीवनाच्या या वाटेवर

  संगत सोबत असते बरोबर

      सुखाच्या त्या उंच झुल्यावर

       नि दुःखाच्या खोल जखमेवर

       घालतेस तु हळूच फुंकर

  नैराश्याच्या अंधारावर

  नि यशाच्या त्या उंच शिखरावर

   अविरत निरंतर तुच बरोबर

        क्रोधाच्या त्या तप्त क्षणांवर

        नि प्रेमाच्या गंधीत सुरांवर

        उमटते बघ तुझीच मोहोर

   भूतकाळाच्या पाऊल खुणांवर

   नि भविष्याच्या स्वप्न झुल्यावर

    निश्चयी ठाम वर्तमानावर

        अनमोल त्या विजयावर

        नि अडखळलेल्या पाऊलवाटेवर

        सावली असते सतत वाटेवर

    ओघळलेल्या त्या अश्रुंवर

    नि खळाळणाऱ्या त्या हास्यावर

     तुझीच छाया आत्मबलावर

         साथ दे तू अशीच अविरत

         जीवनाच्या वाटेवरची

          साथ तुझी असे निरंतर


Rate this content
Log in

More marathi poem from Uma Kolhe