सारीपाट नशिबाचा
सारीपाट नशिबाचा
1 min
143
सारीपाट नशिबाचा
कधी कळला कुणा
हरजीत होत राही
आयुष्य अर्थ समजवी जीवना
फासे पडले मना जोगे
कधी नशीब उजाळले
मनाविरहित पडता फासे
जीवन वेदनेने भेगाळले
नियतीचा खेळ कधी
कुणालाच समजत नाही
सारीपाट आयुष्याचा
ऊन सावली सम बदलत राही
नशिबाचा सारीपाट येथे
सर्वांना खेळावाच लागतो
कसरत तारेवरची प्रत्येकाची
उद्याच्या आशेवर प्रत्येकजण जगतो