ऋण फेडूया भारत मातेचे
ऋण फेडूया भारत मातेचे
तुला मिळालंय स्वातंत्र्य आज या मातीमुळे
विसरु नको रे तिला तू या भ्रष्टाचारासाठी
भगत सिंग, राजगुरु, आझाद झटले या मातीमुळे
मातीसोबत होऊ नको बेईमान थोड्या पैशासाठी!!१!!
कित्येक जवान झाले या देशासाठी शहीद
लाखो शहीद होत आहेत कुठपर्यंत चालेल ही रित,
युद्ध चालू असते तेव्हा बघतो दूरदर्शनवर बातम्या
चार-पाच शहीद झाल्यावर बसतो आम्ही प्रसार करीत!!२!!
कधीच आम्हाला वाटत नाही वीर छत्रपती होण्याची इच्छा
या मातेच्या दुश्मनांना कापून रक्त त्याचे वाहावे तुम्ही
याच मातीत जन्मले बोस, गांधी, विवेकानंद स्वामी
त्यांच्या विचारावर न चालणारी जनता म्हणजे आम्ही!!३!!
याच मातीत जन्मले बाबा त्यांनी लिहिले संविधान
जाती-धर्मासाठी आम्ही घेत आहोत प्राण एकमेकांचे,
बंद करा रे सर्व, खरे भक्त होऊन दाखवू या देशाचे
चला हाती घेवू तिरंगा, ऋण फेडू भारत मातेचे!!४!!
