रम्य ती प्रसन्न पहाट
रम्य ती प्रसन्न पहाट

1 min

12.3K
कळलेच नाही की मला
हात तुझा होता उशाला
मंजुळ आवाज पाखरांचा
माझ्या मनाला हरखून गेला....
रम्य ती प्रसन्न पहाट
सारे वातावरण होती उजळत
किलबिलाट हा एकच होई
पक्षी जणू झाले होते जागृत....
अंगणातील हा पारिजातक
सुगंधी फुले फारच मोहक
सडा, रांगोळी करी कुणीतरी
ललना दिसे ती की सुबक....
तुला येऊन उठवते मी
सृष्टीचे सौंदर्य पाहण्यासाठी
आपल्यातील हे प्रेम कसे
जन्मोजन्मीच्या रेशीमगाठी....
सगळीकडे ही सुंदरता
मनाला कसा आल्हाद देते
तसे तुझे माझे हे नाते
जीवनात रोज आनंद घेऊन येते.....