रडला पाऊस
रडला पाऊस
1 min
188
ओढ पावसाची अशी,
धरणीला गाजे
धरणीचं गाणं जणू
आभाळात वाजे..
आभाळाच्या मनी,
मग गडगड दाटे
ऐकू कळवळ,
जीव धरणीचा फाटे..
वीज काढी फोटू
अशा दोघा काळजांचा.
हारकले थेंब म्हणे
काढ! माझा माझा..
आभाळाने मग असा
टाकला उसासा
आभाळाचे थेंब
देई मातीला दिलासा..
ओघळले थेंब
रानी डोलला हा ऊस
धरणीला भेटून
काल रडला पाऊस..
