रड रे जरा
रड रे जरा
1 min
231
रडण्याने मन रितं होतं
दुखः जरासं फिकं होतं
हसण्याने लाख लोक जिंकले तरी
रडण्याने स्वतःला जिंकता येतं
कधी कधी हसनं ही
मनाची मजबूरी बनतं
पण फूल आहे म्हंटल्यावर
मनाचं फुलनं जरूरी असतं
कोंडल्या हुंदक्यांना
वाट जरा मिळूदे
स्वातंत्र्य काय असतं
त्यांना पण कळूदे
वाहूदे पुर आता
पापण्यांना न्हावू दे
नयनांसवे भावनांना
भिजतांना पाहूदे
रडणं कमजोरी नाही रे
क्रिया आहे निसर्गाची
अश्रूधार वाहूदे ना
खुशी किंवा विरहाची
