राजे तुम्ही पुन्हा जन्माला या!
राजे तुम्ही पुन्हा जन्माला या!
सबंध जातीधर्माला सोबत घेऊन तुम्ही निर्माण केलेलं स्वराज्य सुराज्याच्या नावाखाली आम्ही काय करून ठेवलंय हे पहायला.
अठरा पगड जातीचे मायबाप तुम्ही फक्त मराठा या जातीपुरतचं मर्यादित केलंय आम्ही तुम्हाला हे पहायला.
राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही आज आहोत याची जाणीव न ठेवणारे पहायला.
की तुमचा इतिहास मनाप्रमाणे विखरू अन् लिहू पहाणार्यांना आज आम्ही डोळे झाकून मिरवतोय हे पहायला.
तुमच्या नावावर सत्ता मिळवून ही तुमचा अपमान सहन करणारे कावळे पहायला.
तुमचा पदोपदी अपमान सहन करणारे षंड मावळे पहायला.
तुमच्याच भूमीत म्हणावे तसे ऐश्वर्य मिळवून ही तुमच्या नावाचा एकेरी उल्लेख करणारे बिनउपकारी पहायला.
की तुमच्या नावाची तुलना होतानाही आम्ही फक्त नावापुरतेच शिवभक्त आहोत हे सिद्ध केलंय हे पहायला.
"राजे तुम्ही पुन्हा जन्माला या" कशाला?
