आयुष्य
आयुष्य
1 min
207
आयुष्य;
आई बाबाला आनंदी बघणं आहे
सुख दुःखात त्यांच्या जगणं आहे ..
आयुष्य;
बहिनीच आपल्यावरती रुसणं आहे
हसल्यानंतर आपण गालात तिच हसणं आहे ..
आयुष्य;
भावाने आपली चुक लक्षात आणून देणं आहे
त्याने आपली प्रत्येक भावना समजून घेणं आहे ..
आयुष्य;
मित्रांचं आपल्यावर जीव ओवाळणं आहे
"काही घाबरू नको मी आहे की" असं बोलून त्यांच कवटाळणं आहे ..
आयुष्य;
प्रेयसीन आपल्यासाठी रोजच सजणं आहे
नजरेला नजर भिडताच प्रेमळ तिच लाजणं आहे..