STORYMIRROR

Bhavesh Dhuri

Others

2  

Bhavesh Dhuri

Others

राजा शिवछत्रपती

राजा शिवछत्रपती

1 min
2.7K


सह्याद्री आनंदला, महाराष्ट्राचा आसमंत डोलला,

द-या खो-यातून नाद गुंजला

शिवनेरीच्या कुशीत महाराष्ट्राचा सूर्य उगवला,

महाराष्ट्राचा सूर्य उगवला॥धृ॥

जिजाऊ अन् शहाजींच्या अंगणात वाढणारे ते एक वादळ हेते

छाती ठोकून मुघल सभेत आम्ही मराठे अशी सिंहगर्जना करणारे ते प्रभू श्री रामचंद्राचे वंशज होते 

अन्यायी,चारित्र्यहीन दैत्यांसाठी भवानी तलवार धारक शिवराय जणू एक सावट होते॥१॥

त्यांनी अन्यायाचे कांबळे ओढून निजलेल्या मराठ्याला जागवले

स्वराज्याकरिता "हर हर महादेव"चे स्फुर्तीघोष लावले
मुठभर मावळे घेऊन हजारोंच्या सैन्यदलांना निधड्या छातीने ते भिडले
नाव "शिवाजी" ऐकताच सबंध मुघल साम्राज्य थरारले॥२॥

परस्त्रीबाबत आदर ठेवा अन्यथा शिर कलम करण्यात येईल असे त्यांनी बजावले 
कल्याणच्या सुभेदारीणीच्या वर्णनाचे
"आमच्या आऊसाहेब जर इतक्या सुंदर असत्या,
तर आम्ही किती सुंदर झालो असतो" हे शब्दसुमन उमलताच, सबंध सदरेचे चित्त मोहले॥३

शिवरायांमुळेच मराठीला अभय प्राप्त झाले 
फडकवाया भगवा स्वराज्याचा असंख्य बलिदान केले 
जिजाऊ अन् शहाजींचे स्वप्न स्वराज्याचे या मर्द मराठ्याने साकार केले 

असे पावन तो इतिहास ज्याने न भूतो न भविष्यती याचे साक्षात दर्शन केले॥४॥

असे महाराष्ट्रीयांच्या मस्तकात वणवा,

हृदयात वादळ आणि मनात भगवंता सम निवास करणारे छत्रपती शिवाजी महाराज

त्यांच्यासम ते आणि फक्त तेच होते॥५॥

 

   


Rate this content
Log in