STORYMIRROR

Swati Vibhute

Others

3  

Swati Vibhute

Others

राजा शिवछत्रपती

राजा शिवछत्रपती

1 min
27.5K


.......राजा शिवछत्रपती......

 

"महाराष्ट्राचा सुर्य तो धगधगणारा तळपणारा परमेश्वरी"  || धृ ||

 

त्या सूर्याची किरणे म्हणजे तेजाच्या अखंड  तलवारी

धर्माच्या शत्रुला भेदून जाणाऱ्या चमकारी

स्थान त्याचे सह्याद्रीच्या मिठी

दरी-खोरी कडे कपारी उधळी त्याची घोडी|| १ ||

 

साथ त्याला देई हा समुद्र हा सह्याद्री

 मग सागरावर थैमान त्याचे प्रचंड वादळी

तटांवर फडफडताना दिसे तो भगवा केशरी

गतिमांच्या फौजेवर तुटून पडे बुलंद स्वारी|| २ ||

 

शुरवीरांच्या फुरफुरणाऱ्या भुजेवरी तो बनला गडपती भुजपती

सर्व धर्म समभावाच्या तो ठायी 

आपल्या मातीस करी तो माई || ३ ||

 

गरीब गुण्या-गोविंदाचा तो ईश्वर देव त्याचा उमापती

 इंद्रलाही लाजवेल असा तो अधिपती

दिसे तो संसारी , होता तो संन्यासी , त्यागी

खरा तो श्रीमान योगी , खरा तो श्रीमंत योगी || ४ ||


Rate this content
Log in