STORYMIRROR

Mitali More

Others

3  

Mitali More

Others

राहूनच गेलं

राहूनच गेलं

1 min
175

भ्रुनहत्येतून निघता आलं

नजरे नजरेला टिपता आलं

जगणं कसं,ते ही शिकता आलं

पण बालपण जगणं,ते राहूनच गेलं

हसतांना रडणं आलं

आणि रडतांना हसणं आलं

हसून निमूटपणे बसनं ही आलं

पण खूदकन हसणं,ते राहूनच गेलं

स्वप्न बघता आलं

त्यांना पुर्ण करता आलं

रात्रभर स्वप्नात जगताही आलं

पण चांदण्या टिपणं,ते राहूनच गेलं

सर्वांचं होता आलं

सर्वांना आपलं करता आलं

सर्वांमध्ये मग सामावता ही आलं

पण मीपण जपणं ते राहूनच गेलं

पायरी पायरी मिळवता आलं

दुसर्यांच मन कसं जिंकता आलं

साऱ्या जगताला ही आपलसं केलं

पण स्वतःला जिंकणं ते राहूनच गेलं



Rate this content
Log in