" पुन्हा एका संध्याकाळी"
" पुन्हा एका संध्याकाळी"
1 min
28.4K
पुन्हा एका संध्याकाळी...
तुझ्यापासुन तुझ्यापर्यंतचा प्रवास,
तुझी साद, तुझा सुवास, थरथरत्या कातरवेळी तुझाच आभास..!!
पुन्हा एका संध्याकाळी....
तुझे शब्द, तुझी कल्पना,
आठवणींच्या कल्लोळात तुझीच संवेदना...!!
पुन्हा एका संध्याकाळी....
तुझी सांज, तुझ्या साऊल्या,
माझे शब्द, माझ्या कविता तुलाच वहिल्या...!!
पुन्हा एका संध्याकाळी....
तुझं आभाळ, तुझा वारा,
भटकत्या मनाला तुझा एक सहारा....!!
पुन्हा एका संध्याकाळी....
मी अशी बावरलेली हरलेली,
क्षितिज सीमा ओलांडून फक्त तुझीच उरलेली...!!
पुन्हा एका संध्याकाळी,
तुझ्यापासून तुझ्यापर्यंतचा प्रवास....!!
