प्रसववेदना
प्रसववेदना


विरक्त असेल ही रात्र आज जरी
म्लान तिचे नष्ट करायला,
कवडस्यांनी तिला सजवायला
प्रसंगी कर रुधिरार्पण परी
चव पराजय शब्दाची चाखू तू नको,
ह्या काळोखाला असलेले उत्तर
नैराश्याच्या वणव्याला मात्र तू
मुळीच गिळू देऊ नको
वाट कशाची बघते?
बलवत्तर या नशिबाला हरवणाऱ्या,
कणखर रगड्या प्रयत्नांच्या
रामबाण किल्ल्या का म्हणून तू अडवते?
उठ, जागी हो, फेकून दे ते लंगर
सर्व्वोच्च जरी असेल तुझी पदवी
स्वार्थाच्या या बाजारात,
ती ठरत आहे नुसते एक अवडंबर
सगळे स्थिर आहेत इथे असेपर्यंत संवेदना,
परंतु सोनियाचा तो दिनू पाहण्यासाठी मात्र तुला
झेलावीच लागेल आणखी एक प्रसववेदना !