STORYMIRROR

Rahul Udavant

Others

3  

Rahul Udavant

Others

प्रश्न विचारा प्रश्नाला...

प्रश्न विचारा प्रश्नाला...

1 min
14.2K


प्रश्न विचारा प्रश्नाला, प्रश्न उत्तरही देतो


मार्गदर्शक नसता कोणी, प्रश्न गुरुसुद्धा होतो



प्रश्नालाही बहुतेक चिकित्सक माणसं आवडतात


कारण उत्तरापल्याडचेही प्रश्न अशांनाच पडतात


प्रश्नाचा शोध घेणारांना प्रश्नही नेहमी शोधत असतो 


युगानुयुगे प्रश्न अशा वेड्यांची वाट बघत बसतो 



प्रश्नाच्या पोटात असतात असंख्य गुपितं दडलेली


उत्तरापाठी धावणारांना कधीही न सापडलेली


प्रश्न सदा उत्सुक असतो अगणित उत्तरं द्यायला


मात्र एखादाच धजावतो प्रश्नाची मदत घ्यायला



प्रश्न असतो चिरंतन, उत्तरं मात्र बदलतात


बदलत जाणारी उत्तरंही, प्रश्न बनून हरवतात


मर्यादा असतात उत्तराला, त्याचा काही नेम नसतो 


प्रश्न विचारा प्रश्नाला, प्रश्न उत्तरही देतो!


Rate this content
Log in