Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

Shradha Shetye

Others

4  

Shradha Shetye

Others

परंपरा रक्षाबंधनाची

परंपरा रक्षाबंधनाची

1 min
8


आयुष्याच्या पुस्तकातील, अनमोल आपले नाते

आपल्या प्रेमळ आठवणींनी, फुललेले क्षणच ते.

बालपणी मस्तीखोर मी, केला भारी दंगा

तुझ्याभोवती घातला दादा, दादा म्हणून पिंगा. १


माझ्या सर्व खोड्या, तूच सहन केल्या

बालपणी प्रेमाने घासही, तूच भरवला

तूच झालास माझा, बालपणीचा एकलुता एक मित्र

सुखाचा काळ अन्, रम्य बालपणीचे सारे चित्र. २


नोकरीवाली आई, मग तूच व्हायचा माझी आई

दादा,तुझ्या अपार प्रेमाची, कशी रे होईल उतराई

दादा म्हणजे, कोणत्याही गोष्टीचे नो टेन्शन

दुःखातही खळखळून हसण्याचे, फुल आरक्षण. ३


मोठा भाऊ म्हणजे, हक्काची जबाबदार व्यक्ती

जीवनातील प्रसंगात, खंबीर पाठबळाची शक्ती

बापाचं काळीज, अन् आईची अतूट माया

मोठा भाऊ असतो, आशीर्वादाची भक्कम छाया. ४


साथ भाऊरुपी, विशाल वटवृक्षाची

माया निस्सीम, परमेश्वरी श्रध्देची

वीण बहीण-भावाच्या, अतूट नात्याची

सोबती परंपरा, पवित्र रक्षाबंधनाची. ५


Rate this content
Log in