प्रकृती
प्रकृती
1 min
41K
एक छोटस फूल पडताना बघीतलं,
त्याला कोवळ्या गवताने धरताना बघीतलं.
गवत त्याला कुरवाळीत होतं,
रडु नको अस समजावीत होतं.
त्यावर पडलेले पाय दाखवीत होतं,
तरी कसे उभे हे समजावीत होतं.
फूलाच्या पाकळ्या दुःखवल्या गेल्या होत्या,
आपण सूटे पडणार म्हणून सूकल्या होत्या.
रडत रडत विलग झाली पहिली पाकळी
तिला बघता हळवी झाली दुसरी पाकळी.
एकमेकांनां विलग होताना बघवत नव्हत,
वेदना ऐकताना गवताला साहवत नव्हत.
प्रकृती च्या नियमाकडे बघवत नव्हत.
सुकलेल्या पाकळ्यांनी गवताला झोपवल.
देवाच्या थेंबांनी गवताला जागवल.
एक नव फूल हसताना दाखवल,
प्रकृतीच्या नियमाचा मान राखला गेला.
