STORYMIRROR

Mitali More

Others

4  

Mitali More

Others

प्रेमवीर

प्रेमवीर

1 min
683

ताल सुरांशी जुळेना

चंद्र ताऱ्यांना कळेना

तू गेल्यावर वळणे लाख आली

पण मन मात्र वळेना......

ते तर तिथेच राही

झुरून तुझी गाणी गायी

कवीतांचे संग्रह केले आधी

आता शब्द मात्र गवसत नाही......

फुलेही उमलतात आता

झाडांनाही बहार येतो

पण आठवण तुझी येता गं

आयुष्याचा सार जातो......

रोज रडतो ढाय मोकळून

गाली मात्र हसत राहतो

उजाडलंय गाव माझं

मनी मात्र वसत राहतो......

फुलांना उमलनं कळतं

पण गंध मात्र येत नाही

रोज मरतोय थोडा थोडा

जीव मात्र जात नाही......

पोखरलोय काळजातूनी

मनी अजूनही धीर आहे

जिवंत राहिलाय माणूस फक्त

मेलेला प्रेमवीर आहे......


Rate this content
Log in